नागपूर : महाविद्यालयात भगवत गीता देण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा असा सल्ला देखील पाटील यांनी तावडे यांना दिला आहे.
बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा. स्वतःला विकासपुरुष म्हणवण्यात पंतप्रधान मोदींना मोठेपणा वाटतो मात्र विकास होत नसल्याने आता सरकार या वाटेने जात आहे.#Maharashtra #NCP #mansoon_session #नागपूर_अधिवेशन
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 12, 2018
नॅकचे A आणि A+ चे नामांकन असलेल्या मुंबईतील महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करावेत असा आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. उच्च शिक्षित असलेल्या तावडे यांना आणि त्यांच्या सरकार हिंदुत्ववादी धोरण राबवायचे आहे ते यावरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. या वादग्रस्त निर्णयावर जयंत पाटील यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.
● या विषयावर माझे सरकारला खालील प्रश्न आहेत :
1. महाविद्यालयांत भगवतगीता वाटण्याच्या सरकारच्या निर्णयाचा उद्देश काय..?
2. केवळ A ग्रेड असणाऱ्या कॉलेजनाच भगवतगीता का वाटण्यात आली.?
3. भगवगीतेसोबत गुरुग्रंथसाहेब, कुराण आणि इतर धार्मिक ग्रंथ का देण्यात आले नाहीत.?— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 12, 2018
4. फक्त भगवतगीता देण्याचा निर्णय कोणत्या तर्काने ठरवला गेला ?
5. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का?
6. यापुढील काळात बक्षीस म्हणून सरकार भगवतगीताच देणार आहे का ?
7. सत्तेत आल्यानंतर आत्तापर्यंत सरकारने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात कोणते आमूलाग्र बदल घडवून आणले ?— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 12, 2018
परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवदगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे.
पाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
दरम्यान जर धर्माचा प्रसार करायचाच असेल तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत अशी उपरोधात्मक मागणी आ.कपिल पाटील यांनी केली आहे. ‘जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत होत नव्हतं, पण आता इथेही सुरु होतंय असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
2 Comments