कोट्यावधी शेतकऱ्यांना तीव्र वेदना दिल्याबद्दल केंद्राचा निषेध – जयंत पाटील

jayant patil

मुंबई – केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मागील 40 दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडून बसलेत.

या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नसल्याचे चित्र आहे.सुप्रीम कोर्टाने देखील या मुद्द्यावरून सरकारला फटकारले आहे.

केंद्राने शेतकऱ्यांचे आंदोलन योग्यप्रकारे हाताळले नाही हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून आता स्पष्ट झाले असून कोट्यावधी शेतकऱ्यांना तीव्र वेदना दिल्याबद्दल केंद्राचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.

कृषी धोरणाविरोधी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या भूमिकेचे जयंत पाटील यांनी स्वागत केले शिवाय न्यायव्यवस्थेचे आभारही मानले.हा कृषीप्रधान देशाचा विजय आहे. केंद्राने शेतकऱ्यांचे हे आंदोलन योग्यप्रकारे हाताळले नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या