fbpx

खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत! आधी मराठा व आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे हे स्पष्ट होते. असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. तर राज्य सरकारने आधी जागा वाढवाव्यात आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यावरून आता जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत! आधी मराठा व आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीचा इतका अभ्यास करुनही न्यायालयासमोर त्यांचे सरकार फेल कसे होते? अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

तर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. अध्यादेशाविरोधातील ही याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळली होती. यासाठी सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नव्हती, असंही कोर्टाने फटकारले होतं. त्यामुळे आता कलम ३२ अन्वये हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले आहेत.