fbpx

आयोध्ये वरून आलोया, शेतकरी आंदोलनाची मजा बघातोया ; जयंत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट गाण्याच्या तालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आयोध्यावारीवरून निशाणा साधला. आयोध्या वरून आलोया, लै दुरून आलोया, शेतकरी आंदोलन करतोया, आम्ही मजा बघातोया, समद्या पक्षात मी लै जोशात रंगात आलोया, झालं झिंग झिंग झिंगाट, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील यांनी शिवसेनेवर केलेली टीका

आयोध्या वरून आलोया
लै दुरून आलोया
शेतकरी आंदोलन करतोया
आम्ही मजा बघातोया
समद्या पक्षात मी लै जोशात
रंगात आलोया

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट

रोजगार गेलया
शेतकरी कंगाल झालया
समद्या राज्याला झालीया
आपल्या युतीची घाई
कधी होणार तू सेना
आमच्या आमदारांची आई

झालं… झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंगाट..
झिंग झिंग झिंगाट