fbpx

सरकारने योजनांच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी कर्जमाफीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. योजनांच्या नावावर या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, यातचं शेतकरी कर्जबाजार झाला आहे, याचमुद्यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. युती सरकारने ५ वर्षात बळीराजाची निव्वळ फसवणूक केली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

इतकेच नव्हे तर, शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे फसवणाऱ्या सरकारची पाच वर्षे संपत आली. मात्र अजूनही ३० लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, असेही पटतील यांनी म्हंटले. तसेच, योजनांच्या नावावर या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत असा टोलाही पाटील यांनी लगावला.