शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? ; जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा :  कांदा अनुदानावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान साडेचार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचलेले नाही, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान कांदा अनुदानावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर परंतु अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान साडेचार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचलेले नाही, असा आरोप करत असले सरकार काय कामाचे? असा सवालही पाटील यांनी केला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांस कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? असा सवालही पाटील यांनी केला.Loading…
Loading...