fbpx

‘मागेल त्याला शेततळे’ नाही तर ‘आमचा असेल त्याला शेततळे’ ही सरकारची घोषणा – जयंत पाटील

Jayant patil

टीम महाराष्ट्र देशा :  सरकारच्या मागेल त्याला शेततळे’ या योजनेवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारची मागेल त्याला शेततळे ही घोषणा ‘जमेल त्याला शेततळे’ किंवा ‘आमचा असेल त्याला शेततळे’ अशी असायला हवी, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान जयंत पाटील यांनी सरकारच्या मागेल त्याला शेततळे’ या योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत १ लाख ८२ हजार अर्ज प्राप्त झालेले असताना फक्त ६२,०००च्या आसपासच शेततळी बांधण्यात आली. जर प्राप्त अर्जांपैकी सरकार लाखभर शेततळी देखील बांधू शकत नसेल तर ही घोषणा ‘जमेल त्याला शेततळे’ किंवा ‘आमचा असेल त्याला शेततळे’ अशी असायला हवी, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.