‘भाजप-आणि शिवसेना आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठ विधान केले आहे.

पाटील यांनी भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागलले आहेत. आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे असा आरोप केला तसेच भाजपने दुसरा पक्ष फोडण्यापेक्षा काम केले असते, तर जनतेचा आशिर्वाद मिळाला असता असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

jayant patil vr cm

तसेच पुढे बोलताना ‘अनेक लोक भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. जेव्हा जेव्हा नेत्यांनी अशा प्रकारे पक्ष बदलला आहे तेव्हा तिथल्या जनतेने त्या नेत्यांना धडा शिकवला आहे, याची जाणीव जाणाऱ्या लोकांना करुन दिली. इतर पक्ष अशाप्रकारे फोडले जात आहेत हे भाजपचे कमकुवतपणाचे उदाहरण आहे असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

येत्या 13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार : चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीला अजून एक धक्का; ‘या’ माजी आमदाराने दिली सोडचिट्ठी