‘काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल’

jayant patil - nana patole - uddhav thackeray

तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. स्वबळाच्या नाऱ्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच टोलेबाजी सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीतील तणाव वाढत असतानाच नाना पटोले यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही. पण काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP