नांदेड : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतरच महाराष्ट्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल, असे मानले जात आहे. मात्र त्यापूर्वी शिंदे गट आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलचं शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिंदे गटात असलेले आमदार दीपक केसरकर यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांनी नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली. शरद पवारांनी शिवसेना फोडली, असा आरोप केसरकरांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दीपक केसरकरांच्या आरोपला राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
“कोकणात आल्यानंतर शरद पवार यांच्या गाडीत बसून केसरकरचं फिरत होते. सिंधुदुर्गचे समुद्र किनारे दाखवण्यासाठी दीपक केसरकर कायम शरद पवारांच्या मागे असायचे. दीपक केसरकरांचे स्थानिक मतभेद झाले म्हणून ते शिंदे गटात गेले. ते खरे शिवसैनिक नाही आहेत. ते जे बोलत आहेत त्यात तथ्य नाही. कधीही शिवसेना फोडण्याचे काम शरद पवार यांनी केले नाही”, असे जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते दीपक केसरकर ?
महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते, असा आरोप केसरकर यांनी केला आहे. शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असे केसरकर म्हणाले.
दीपक केसरकर म्हणाले, मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. मी राष्ट्रवादीत असताना शरद पवार मला विश्वासात घेऊन सांगायचे. नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे. ही अट ठेवली नसल्याचे शरद पवारांनी मला सांगितल्याचे केसरकर म्हणाले.
छगन भुजबळ यांना तर शरद पवार स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात, असा दावा देखील दिपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांनी कलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावेळी केसरक यांनी उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पाठींब्याचे कौतुक केले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा निर्णय घेतल्याचे केसरकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire : “मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार ‘मातोश्री’वर डोकं टेकवतील”; चंद्रकांत खैरेंचा दावा
- Prakash Ambedkar : “हे श्रीमंतांचे सरकार, त्यामुळे पेट्रोलच्या दरात…”, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- Maharashtra Cabinet Decision | नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान ; शिंदे सरकारचा निर्णय
- Navneet Rana : “मागच्या सरकारला जमल नाही ते…”, शिंदे सरकारच्या मोठ्या घोषणेनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- kangana Ranaut | पहा कंगना रानौतचा ‘इंदिरा गांधी’ लुक; ‘इमर्जन्सी’ चा टीजर रिलीज
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<