fbpx

video- मुख्यमंत्र्यांनी शिंपडलं म्हणून ‘राणे’ पवित्र झाले का ? : जयंत पाटील

सेलू : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेली हल्लाबोल यात्रा आज मराठवाड्यातील सेलू तालुक्यात येवून पोहचली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी शिंपडल म्हणून राणे पवित्र झाले का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाला दिसेल त्याला पक्षात घेण्याची सवय लागली आहे. असेही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस याचं सरकार आल्यापासून राज्यात ९ हजारापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या. देशाची आर्थीक परिस्थिती संकटात येऊ लागली आहे. नरेंद्र मोदींवर टीका करत पाटील म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेकदा पत्रकार परिषद घेतात. मात्र आपले पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता येणार नाहीत म्हणून ते फक्त आपल्या मर्जीतल्या पत्रकारांना मुलाखती देतात. आजपर्यंत नरेंद्र मोदींनी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही. कारण पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची ताकद नरेंद्र मोदीत नाही.

भारतीय जनता पक्षाला दिसेल त्याला पक्षात घेण्याची सवय लागली आहे. ज्यांनी नारायण राणे यांना विरोध केला, ज्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. तसेच विधानसभेत विरोधी पक्षात असतांना राणेंवर भ्रष्टाचारचे आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना पक्षात घेतले. देवेंद्र फडणवीस यांनी शिंपडल म्हणून राणे पवित्र झाले का? असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

मानवसंसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह महाराज यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा निषेध करतांना पाटील म्हणाले, माणसाची निर्मिती कशी झाली यावर जगात अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. तरी सत्यपाल सिंह महाराजांनी ते नाकरले असून माकडापासून मानवाची निर्मिती झालीच नाही. असे वक्तव्य केले.

गिरीश बापटांवर टीका करत पाटील म्हणाले,  हल्लाबोल यात्रेचा प्रतिसाद व धनंजय मुंडेंची भाषणे एकूण गिरीश बापट यांनी ‘काय मागायचं ते आताच मागा पुढे आमच सरकार येणार कि नाही माहित नाही’ असे बोलले होते. तसेच तरुण मुलींसमोर काय बोलाव आणि काय नाही. याची मर्यादाच बापटांनी ठेवली नाही. त्यामुळे सर्व जनतेने सध्याच्या सरकारला घरी घालण्यासाठी एकसंघ पणाने भूमिका निश्चित करण्याची गरज आहे. असे आवाहन केले.

1 Comment

Click here to post a comment