fbpx

जायकवाडीचा पाणीसाठा 75 टक्क्यांच्या घरात

Jayakwadi dam

औरंगाबाद:  पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून गोदावरीत पाणी सोडण्यात येत असल्याने जायकवाडी धरण आता जवळ जवळ 75 टक्के भरत आले आहे. जायकवाडी धरणातूनही पूरनियंत्रणाचा भाग म्हणून गोदावरीत पाणी सोडण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे शंभर टक्के भरून आणि त्या धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांना पाणी सोडून सर्व शेततळी भरून घेतल्यानंतरही पाऊस चालूच असल्याने गेल्या 24 तासात जायकवाडी धरणात 2.27 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

गेल्या दोन दिवसात नगर आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने ही आवक वाढली आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा ही धरणे भरली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व आठ धरणे शंभर टक्के भरली आहेत. बुधवारी जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1516. 28 फूट इतकी होती. आता या धरणात जिवंत पाणीसाठा 1543.568 दशलक्षघनमीटर इतका आहे. मराठवाड्यातील गोदावरीच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देवून जायकवाडीतून पाणी सोडण्यात येत आहे.

2 Comments

Click here to post a comment