fbpx

शिवसेनेचा पीकविमा मोर्चा ही केवळ राजकीय स्टंटबाजी – जयाजी सूर्यवंशी

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या पीकविमा मोर्चावरून शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेचा पीकविमा मोर्चा ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे, अशी टीका सूर्यवंशी यांनी केली आहे.

शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. बुधवारी 17 जुलैला शिवसेनेना पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार आहे. येत्या 17 जुलैला पिकविमा कंपन्यांविरोधात शिवसेना वांद्रे कुर्ला संकुलात इशारा मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा शेतकर्‍यांचा नसून शेतकर्‍यांसाठी असणार आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

दरम्यान शिवसेनेच्या पीकविमा मोर्चावरून शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेचा पीकविमा मोर्चा ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. विमा मोर्चे काढून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा शिवसेनेचा हा केविलवाणी प्रयत्न आहे, असे सूर्यवंशी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर शिवसेनेचा हा मोर्चा फक्त दिखावा असल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेला खरच शेतकऱ्यांची मदत करायची असेल तर, लोकसभेमध्ये मोदी सरकारचा बुरखा फाडावा. कारण पीक विमा योजनेच्या माध्यमातून रिलायन्स आणि अन्य कंपनांच्या मालकांना पोसण्याचे काम दिल्लीवाले करत असून हीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजूबाजूला बसत असतात, असेही सूर्यवंशी यांनी म्हंटले.

याचबरोबर पीकविमा प्रश्नावर मोर्चे कडून काहीच होणार नाही. शिवसेनेला शेतकऱ्यांची खरचं चिंता असेल तर त्यांनी, याविषयी लोकसभेत आवाज उठवावा आणि शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यावा, असेही त्यांनी म्हंटले. तसेच शिवसनेने केवळ मतासाठी विम्याचे राजकरण करून शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांची सहनशीलता संपलेली आहे. त्याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घेऊ नये, असेही सूर्यवंशी यांनी म्हंटले.