fbpx

शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंतांना मंत्रिमंडळात संधी ?

टीम महाराष्ट्र देशा : अखेर बहूप्रतिक्षीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवार १६ जून रोजी होणार हे नक्की झाले असून, सकाळी ११ वाजता नवे मंत्री शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेले जेष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांचं नाव देखील निश्चित मानलं जात आहे.

तानाजी सावंत हे यवतमाळ वाशीममधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा परंडा येथे साखर कारखाना आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवासी आहेत. सध्या सावंत हे सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

तर जयदत्त क्षीरसागर हे बीडचे आमदार असून ते गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये नाराज होते. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडेंचे वाढते प्रस्त पाहता क्षीरसागर यांनी घड्याळाची साथ सोडत शिवबंध हातामध्ये बांधले होते. त्यामुळे क्षीरसागर यांचे मंत्रिपद देखील निश्चित मानले जात आहे.