भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश – जया बच्चन

jaya bacchan

टीम महाराष्ट्र देशा : देशातील महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर चांगलीच आगपाखड केली आहे. ‘‘भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश बनत आहे. त्यावर सरकारचे काय म्हणणे आहे?, असा थेट सवाल जया बच्चन यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

‘रॉयटर्स’च्या अहवालाचा हवाला देत या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेले अत्याचाराचे आकडे आणि तुमचे आकडे वेगळे कसे?, असा प्रश्नही त्यांनी बाल विकास राज्यमंत्री वीरेंद्र कुमार यांना विचारला.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत कठुआ प्रकरणावरुन वादळी चर्चा झाली. या चर्चेत भाग घेताना जया बच्चन यांनी सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावरून खडे बोल सुनावले आहेत.