मटन भाकरीची रांगड़ी मेजवानी म्हणजेच हॉटेल जय भवानी….!

jay bhavani hotel khed shivapur

पुणे-  पुणे –सातारा रोडवर प्रवास करत असताना एका ठिकाणी आपोआप गाडीला ब्रेक लागतो ते ठिकाण म्हणजे ‘हॉटेल जय भवानी’, सामान्य नागरिकांपासून ते सिने-कलावंतापर्यंत प्रत्येकाच्या मेजवानीचे आवडते हॉटेल म्हणजेच ‘हॉटेल जय भवानी’, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी फक्कड रसरशीत मेजवानी ठरणारे हॉटेल जय भवानी.

हॉटेलमध्ये नॉनव्हेज मागवायचं असेलं तर अनेकांची मटण भाकरीला पसंती असते. पण त्याठिकाणी मटण भाकरीची गावरान आणि घरगुती चव मिळेलच, याची काही खात्री नसते. परंतु खेड-शिवापूर येथील शंकरशेठ कोंडे-देशमुख यांनी त्यांच्या जय भवानी हॉटेलमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून मटण भाकरीची अस्सल गावरान चव जोपासली आहे. त्यामुळेच पुणे-सातारा महामार्गावर मटण भाकरीसाठी खवयै हमखास हॉटेल जय भवानीलाच पसंती देतात. येथील मटण भाकरीची लाजवाब मेजवानी अनेक हिंदी, मराठी कलाकार तसेच राजकीय व्यक्तींच्याही पसंतीस उतरली आहे.

jay bhavani hotel khed shivapurफास्ट फुडच्या जमान्यात वेगवेगळ्या पदार्थांची हॉटेलमधील रेलचेल वाढली आहे. असे असले तरीही घरगुती पद्धतीच्या व गावरान जेवणाला ग्राहकांची नेहमीच पसंती असते. हे जय भवानीचे मालक शंकरशेठ कोंडे यांनी पंधरा वर्षापुर्वी ओळखले. त्यामुळेच स्वतः माळकरी असूनही ग्राहकांच्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी त्यांनी पुणे-सातारा महामार्गावर ख़ास मटण भाकरीचे हॉटेल जय भवानी सुरू केले. ग्राहकांना याठिकाणी घरगुती पद्धतीने चुलीवर शिजवलेले मटण, गावरान चिकन आणि भाकरी मिळू लागली, त्यामुळे अल्पावधीतच जय भवानी खवैयांच्या पसंतीस उतरले. तेव्हापासून आजतागायत हॉटेल जय भवानीमधील चुलीवरील गावरान चिकन आणि मटण भाकरीचा आस्वाद खवैये घेत आहेत. अन विशेष म्हणजे ही घरगुती चव आजही कायम असल्याने जय भवानीकडे खवैयांचा ओघ वाढतोच आहे.

jay bhavani hotel khed shivapur
पुणे-सातारा महामार्गावर असताना नॉनव्हेजचा पर्याय समोर आल्यास खवैयांची पावले आपोआप हॉटेल जय भवानीकडे वळतात. चुलीवर भाजलेली खमंग ज्वारी तसेच बाजरीची भाकरी, चुलीवर शिजवलेले गावरान चिकन आणि मटण ही त्यांची खासियत. येथे खाल्लेली मटण-भाकरीची मेजवानी खवैयांच्या कायमच लक्षात राहते. याठिकाणी मिळणाऱ्या मटण भाकरीच्या मेजवानीने अनेक नामवंत हिंदी आणि मराठी चित्रपटातील कलाकार तसेच मोठ्या राजकीय व्यक्तींना भूरळ घातली आहे.

jay bhavani hotel khed shivapurjay bhavani hotel khed shivapur

Loading...

पुणे-सातारा महामार्गावरून जाताना ही मंडळी हमखास येथून मटण भाकरीचा आस्वाद घेऊनच पुढे जातात.  मटण भाकरीच्या अस्सल रांगड्या गावरान चवीने खवयै खूश होतात. “आपल्याला हवं त्याप्रमाणे मिळालं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा ग्राहकांची असते. आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून फक्त ग्राहकांची ही अपेक्षा पुरविण्याचं काम प्रामाणिकपणे करत आलो आहोत, म्हणूनच येथून खवयै नेहमीच समाधानी आणि तृप्त होऊनच परततात”, असे शंकरशेठ कोंडे सांगतात.

हां आणि फक्त मटण भाकरीच नाही बरं का. तर शाकाहारींसाठी सुद्धा याठिकाणी खास पिठलं भाकरीचाही बेत असतो. येथे चुलीवरील गरमा-गरम भाकरी आणि झणझणीत पिठलं आणि त्याच्या जोडीला शेपू आणि मेथीची भाजी मिळते. त्यामुळे या गावरान शाकाहारी जेवणाचा  आनंद घेतल्यास खवैयांच्या तोंडून वा! क्या बात है. अशीच प्रतिक्रिया येते. आपणालाही एकदा या गावरान आणि घरगुती पद्धतीच्या मेजवानीचा आनंद घ्यायचाय, तर एकदा हॉटेल जय भवानीला जायलाचं हवं.

Loading...

संपर्क-:  शंकरशेठ कोंडे-देशमुख- 098222 43169

Loading...