ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर राज ठाकरेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. भेटीवेळी जावेद अख्तर आणि राज ठाकरे यांच्यात सध्याची सामाजिक स्थिती, राजकीय परिस्थिती तसेच साहित्य, कला अशा विविध विषयांवर चर्चा झाली. कृष्णकुंज यान राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे हे उपस्थित होते.

Loading...

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा मंगळवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी वसईतील चिमाजी आप्पा मैदानावर होणार असून या सभेसाठी मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यांच्या महराष्ट्र दौऱ्याची ही सुरुवात असल्याने ते कुणावर निशाणा साधणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.Loading…


Loading…

Loading...