नवी-दिल्ली : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. तद्पश्चात या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. याच मुद्द्यावरून आता गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात जावेद अख्तर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आपल्या पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी अनिश्चित आणि अनेकांना केवळ काल्पनिक वाटणाऱ्या धोक्याबद्दल चर्चा केली. हा धोकाही त्यावेळी होता जेव्हा ते बुलेटप्रूफ गाडीमध्ये बसले होते आणि त्याच्या सर्व बाजूंनी हातात एलएमजी घेऊन सुरक्षारक्षक उभे होते. मात्र दुसरीकडे जेव्हा २० कोटी भारतीयांना उघडपणे नरसंहाची धमकी देण्यात आली तेव्हा ते एक शब्दही बोलले नव्हते. मोदीजी का?’, असे अख्तर ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
Our PM has met the president to discuss a vague n according to many an imaginary threat to himself when he was in a bullet proof vehicle surrounded by the body guards with LMGs but has not uttered a word when 200 M Indians are openly threatened by a genocide. Why Mr Modi ?
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 10, 2022
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून राजकीय वातावरण चांगलेच चिघळल्याचे बघायला मिळाले. तसेच सोमवारी(१० जाने.)सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<