जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएलला मुकण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा :  टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या संभाव्य वेगवान गोलंदाजांना आयपीएलमध्ये विश्रांती देण्याची मागणी कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली होती. बीसीसीआय विराटच्या सूचनेवर विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एखाद्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळवण्याबाबतचा निर्णय संघ मालकांकडे असतो. काही खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत बीसीसीआय संघमालकांसोबत चर्चा करणार आहे. जर विराट कोहलीची सूचना बीसीसीआयने गांभीर्याने घेऊन अंमलबजावणी केली तर बुमराहप्रमाणे इतर प्रमुख भारतीय गोलंदाजांनादेखील आयपीएलमध्ये विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...