fbpx

जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त,तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा – भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यात तो भारताची लाज राखू शकेल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाल्याने बुमराहच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते.

भारतीय संघाने लॉर्डसवर मोठा पराभव ओढवून घेतला. एक डाव आणि 159 धावांनी झालेला हा पराभव भारतीय चाहत्यांसाठी निराशाजनक ठरला आहे. या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारांत टीम इंडियाचा फ्लॉप शो झाला. पहिल्या सामन्यात एकट्याने 200 धावा करणारा विराट कोहली दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला. या पराभवाने अनेक लाजिरवाणे विक्रम भारतीय संघाच्या नावावर नोंदवले गेले.

जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीदवर गोळीबार

हिना गावित हल्ला प्रकरण : दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे उद्या धुळ्यात मोर्चा