बूम बूम बुमराह…. भारत विजयापासून 1 पाऊल दूर

टीम महाराष्ट्र देशा : भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या. आता सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताला विजयासाठी १ गडी बाद करायचा आहे, तर इंग्लंडला विजयासाठी अजून २१० धावांची गरज आहे. आज दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा पहिल्या सत्रात इंग्लंडने ४ गडी गमावले. त्यानंतर बटलर-स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. पण अखेर नव्या चेंडूवर भारताच्या जसप्रीत बुमराने ५ बळी टिपून इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला.

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा आज चाैथा दिवस असून इंग्लंडपुढे विजयासाठी एकूण ५२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. बिनबाद २३ या धावसंख्येवरुन आज दिवसाचा खेळ सुरू झाला. पहिल्या सत्रात इंग्लंडने सलामीवीर जेनिंग्स (१३), अॅलिस्टर कुक (१७), कर्णधार जो रूट (१३) आणि नवोदित ओली पोप (१६) हे चार गडी गमावले. पण दुसऱ्या सत्रात इंग्लंडने पूर्ण वर्चस्व राखले. जोस बटलर आणि बेन स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी केली. बटलरने झुंजार शतक (१०६) केले. पण बुमराने त्याला बाद केले. पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर, वोक्स ४ धावांवर आणि स्टोक्स ६२ धावांवर बाद झाला. सध्या आदिल रशीद आणि जेम्स अँडरसन हे दोघे मैदानावर खेळत आहेत.

नीटची परीक्षा वर्षातून एकदाच