जसप्रीत बुमरा दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

लंडन : भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला बुमरा मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली आहे. या संघात बुमराला जायबंदी असूनही स्थान देण्यात आले आहे. पण बुमरा त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमधून अजून सावरू शकलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराला खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, भारतीय फलंदाज मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. याचप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने ११ जणांच्या चमूत बदल करू नये, असे सल्ले माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिले आहेत.

 

भाजपला आणखी एक मोठा झटका! ‘या’ वरिष्ठ नेत्याने काढला नवा पक्ष