अॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड: अशाप्रकारे आऊट होणारा जेसन रॉय पहिलाच क्रिकेटपटू

काल इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात इंग्लंडच्या जेसन रॉयला विचित्र पद्धतीने बाद देण्यात आले. अॉब्स्ट्रक्टिंग द फील्ड या नियमाखाली आऊट होणारा तो टी२० क्रिकेट मधील पहिलाच खेळाडू बनला.

१६व्या षटकात क्रिस मॉरिस गोलंदाजी करत होता. लियाम लिविंगस्टोन पहिला चेंडू बॅकवर्ड पॉइंडच्या दिशेने खेळला त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या एंडी फेलुक्वेयोने चेंडू पकडून  नॉन स्ट्राइकर एंडला फेकला. रॉय  पिचच्या अर्ध्यात धाव घेण्यासाठी पळत आला होता परंतु स्ट्राइकर एंडला असलेल्या लिविंग स्टोनने त्याला परत पाठविले. त्यावेळी एंडी फेलुक्वेयोने फेकलेला चेंडू रॉयच्या बुटांवर लागला.

त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि विशेष करून क्रिस मॉरिस अॉब्स्ट्रक्टिंग द फील्डचा अपील केला. अंपायर माइकल गॉफने हा चेंडू डेड असा घोषित करत दुसऱ्या पंचांशी चर्चा केली. शेवटी थर्ड अंपायरची मदत घ्यायचं ठरलं. निर्णय घ्यायला थर्ड अंपायरने वेळ घेत रॉयला बाद ठरवले.

रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होत की रॉयने परत धावत येताना जाणूनबुजून विरुद्ध बाजूने धावत आला. त्यामुळे थर्ड अंपायरने आऊट असा निर्णय दिला.

पहा नक्की काय झाले

यावर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्सने तीव्र नाराजगी व्यक्त केली.

विशेष म्हणजे या सामन्यात इंग्लंडचा फक्त तीन धावांनी पराभव करत आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.