जपानला गवसला अमूल्य खजिना

जपान

वेब टीम-  जपानच्या मिनिमितोरी बेटांजवळ असलेल्या चिखलात संशोधकांनी 1 कोटी 60 लाख टन वजनाची पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजे सापडली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यांचा वापर स्मार्टफोन, मिसाईल सिस्टीम, रडार, ताचे कॅमेरा लेन्स, सुपर कंडक्टर्स, बॅटरी सेल बनविण्यासाठी केला जातो.

सर्व जगाची गरज कित्येक शतके पुरविली जाईल इतका प्रचंड साठा याठिकाणी आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. या खनिजांमध्ये यट्रीयम, युरोपियम, टर्बियम, डायस्प्रोशियम खनिजे आहेत. अर्थात या बेटांवर जाणे आणि तेथून हि खनिजे आणणे हे सोपे काम नाही. मात्र जपानने हे साध्य केले तर त्यांना अतोनात पैसा मिळू शकणार आहे असे समजते.