‘जाणता राजा’ महानाटय़ देशातील सर्व भाषांमध्ये नेण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय घेणार पुढाकार

janata raja , babasaheb puranadare

टीम महाराष्ट्र देशा- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’च्या माध्यमातून शिवचरित्र जगासमोर मांडले. त्यांचे कार्य फार मोलाचे आहे. त्यामुळे हे महानाटय़ देशातील सर्व भाषांमध्ये नेण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आम्ही प्रयत्न करू. ती आमची राष्ट्रीय जबाबदारी आहे असं विधान सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी केलं आहे.

 

दिल्लीकरांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे. ६ एप्रिल ते १० एप्रिलदरम्यान थेट ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात ‘जाणता राजा’चे प्रयोग होतील.या जंगी कार्यक्रमाची घोषणा केली ती केंद्रीय सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी केली .

महाराजांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून दिल्लीकरांना ते आता अनुभवण्यास मिळणार असल्याचा आनंद वाटतो, असं शर्मा यांनी सांगितले .या वेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि महाराष्ट्रभूषण हे महानाटय़ाचे सर्वेसर्वा बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र दिल्लीकरांपुढे मांडताना मला खूप आनंद होतो आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगभर पोहोचावे, अशी माझी इच्छा आहे असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलं.

1 Comment

Click here to post a comment

  • Hi. I have checked your maharashtradesha.com and i see you’ve got
    some duplicate content so probably it is the reason that you don’t rank hi
    in google. But you can fix this issue fast. There is a tool that rewrites content like human, just search in google:
    miftolo’s tools