चाकरमान्यांसाठी नाशिकपर्यंत धावली जनशताब्दी एक्सप्रेस

मनमाड : मनमाड येथून नाशिकला जाण्यासाठी गाडी नसल्याने दररोज नाशिक येथे कामा निमित्त जाणाऱ्या चाकरमान्यानी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत गोदावरी एक्सप्रेस सोडण्याची मागणी केली अखेर जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी नाशिक पर्यंत पुढे सोडण्यात आली.

त्यामुळे चाकरमान्यांना नाशिक पर्यन्त जाण्याची सोय झाली. विशेष म्हणजे ही गाडी लासलगाव व निफाड येथेही थांबा देण्यात आला. आसनगाव जवळ काल झालेल्या अपघातानंतर डबे हटविण्याबरोबरच इतर कामे युद्ध पातळीवर केली जात असून दुपार पर्यंत एकेरी मार्ग सुरू होण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान दुरंतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आज ही विस्कळीत असून अनेक लांब पल्ल्याच्या जवळपास सर्वच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

You might also like
Comments
Loading...