सैराट चा रिमेक लवकरच हिंदीत; या अभिनेत्रीची मुलगी असेल आर्चीच्या भूमिकेत .

वेबटीम-मराठी सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू या सारख्या असंख्य डायलॉगसाठी सैराट जगप्रसिद्ध झाला.१०० कोटी चा गल्ला जमविणाऱ्या सैराट चा रिमेक कन्नड मध्ये देखील करण्यात आला.तिथे देखील सैराट ने चांगला गल्ला कमविला.

आता लवकरच हिंदी मध्ये देखील सैराटच रिमेक करण्यात  येणार आहे या चर्चेला उधाण आल आहे.या हिंदी सैराट च्या रिमेक मध्ये आर्चीची भूमिका कोण  साकारेल या कडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या  हिंदी सैराट च्या रिमेक मध्ये श्रीदेवी ची मुलगी जान्व्ही ही आर्ची ची भूमिका साकारणार आहे.जान्व्हीचा हा पहिला चित्रपट असेल.

जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूविषयी सांगायचे झाल्यास, लवकरच ती तिच्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वृत्तानुसार, येत्या नोव्हेंबर महिन्यापासून ‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट मराठी ‘सैराट’चा रिमेक असणार आहे.