भाजप शिवसेनेला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय जनसंघर्ष थांबणार नाहीः अशोक चव्हाण

केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेनेच्या नाकर्त्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. आज जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे या यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ झाला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, फैजपूरची ऐतिहासीक भूमी उर्जा देणारी आहे. फैजपूरच्या अधिवेशनाने देशाला दिशा दिली व जुलमी इंग्रज सरकारच्या तावडीतून देशाला मुक्त केले. तसाच प्रकारे भाजपला सत्तेवरून दूर केल्याशिवाय आता हा जनसंघर्ष थांबणार नाही. देशोतली लोकशाही व्यवस्था मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

गांधीजींच्या चरख्यासोबत फोटो काढणा-यांच्या पूर्वजांचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान आहे? असा सवाल करून राजकीय फायद्यासाठी भाजप महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावांचा वापर करत आहेत. त्यांच्या विचारांशी भाजपचा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झालेली जनता आता विचारतेय क्या हुआ तेरा वादा? पण मुख्यमंत्र्यांकडे याचे काही उत्तर नाही.

भाजपचा भ्रष्ट चेहरा आता राज्यातील जनतेसमोर आला असून भाजपला पराभूत केल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे खा. चव्हाण म्हणाले.