जान मोहम्मदचे ‘दाऊद’शी जुने संबंध, एटीएसची माहिती

ATS

मुंबई: एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. काल दिल्ली पोलिसांकडून दहशतवादी कटाच्या कारस्थान प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. यापैकी जान मोहम्मद हा मुंबईमधील धारावीचा असल्याचे समोर आले आहे. जान मोहम्मदबद्दल एटीएसने एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

जान मोहम्मदचे साधारण २० वर्षांपासून दाऊदशी जुने संबंध होते. सध्या त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तो धारावीच्या झोपडपट्टीत रहायचा.१३ तारखेला तो दिल्लीला जाणार होता. तिकीट उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेमधून तात्काळने जाण्याचं नियोजन केलं. आरोपी गोल्डन टेम्पल ट्रेनने दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मद अली महम्मद शेखला रेल्वे राजस्थानमधील कोट्यामध्ये अटक करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसचं एक पथक आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली आहे. आमचे पोलिस त्यांना हवी असलेली माहिती देतील.असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या