‘जन आशीर्वाद यात्रे’ला पुन्हा सुरवात, यात्रेच्या समारोप सभेला पंतप्रधान मोदी उपस्थितीत राहण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढली आहे. तर ही यात्रा शिवसेना युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे. उद्या पासून जन आशीर्वादच्या दुसऱ्या टप्याला पुन्हा सुरवात होणार आहे. विशेष म्हणजे ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या समारोप सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेचं सक्रीय झाले आहेत. तर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जन आशीर्वाद यात्रे’वर आहेत. कोल्हापूर – सांगलीला आलेल्या महापुरामुळे जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र कोल्हापूर आणि सांगलीचे जनजीवन सुरळीत सुरु झाले आहे. त्यामुळे ‘जन आशीर्वाद यात्रे’ला पुन्हा सुरवात होणार आहे.

दरम्यान यात्रा स्थगित होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भात चांगलाच जनसंपर्क केला होता. शाळा , महाविद्यालये यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या यात्रेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यां सोबत आदित्य ठाकरेंनी जास्त वेळ घालवाल. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.