पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून, एक नागरिक देखील गंभीर जखमी झाला आहे. काल देखील दहशतवाद्यांकडून जवानांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये १९ जवान जखमी झाले होते. या परिसरात सध्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान जम्मूमध्ये बीसी रोडवरील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह पाच जखमी झालेत. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने कठुआमधील शाळा बंद ठेवल्या आहेत. परिसरातील एक लाखांवर रहिवाशांनी स्थलांतर केलं आहे. यावर्षी झालेल्या गोळीबारात ३९ नागरिक मृत्युमुखी पडले आणि १८ जवान शहीद झाले आहेत.

You might also like
Comments
Loading...