fbpx

जम्मू काश्मीर : राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्धाची तयारी ?

सह्याद्री वृत्त सेवा / भा.वृ.सं.- जम्मू काश्मिरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून पाकिस्तानकडून होणा-या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी केंद्र सरकार पाकिस्तान बरोबर मर्यादीत युद्ध किंवा सर्जीकल स्ट्राईकसारखा प्रयोग करण्याची शक्यता आहे.

राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडींचा विचार करता, तेथे राष्ट्रपती शासन लागू करण्यात येईल, हे आता स्फष्ट झाले आहे. असे झाल्यामुळे राज्यात थेट केंद्रिय गृह मंञालयाचे नियंञण असणार आहे.दरम्यान, राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाल्यास, तेथे केंद्राकडून काही प्रशासकीय अधिका-यांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू होईल. याची तयारी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोबाल आणि केंद्रिय गृह मंञालयाच्या अधिका-यांची चर्चा सुरू असल्याचे वृत्त देखील समोर आली आहे.

या सगळया घडामोडींच्या विचार करता, केंद्र सरकार आक्रमक भूमिका घेत, सीमेवर मोठी कारवाई करून शांतता प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.