भाजपच्या ‘या’ उपमुख्यमंत्र्यांनी दिला पदाचा राजीनामा

श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या समर्थनात काढलेल्या रॅलीत सहभाग घेतल्यामुळे जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांवर सर्वच स्थरातून टीका होत आहे. राज्य मंत्रिमंडळातील भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.

कठुआ बलात्कार प्रकरणानंतर भाजपचे मंत्री लाल सिंह आणि चंद्रप्रकाश गंगा यांनी या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनात निघालेल्या रॅलीत सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या सर्व प्रकारानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता निर्मल सिंह यांच्या जागी कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून आज दुपारी शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा राजभवन ऐवजी कन्वेन्शन सेंटरमध्ये होणार असून राज्य सरकार वर्षांत दोन वेळा आपले सचिवालय बदलत असते. सहा महिने श्रीनगर येथून तर ६ महिने जम्मू येथून कामकाज चालते.

You might also like
Comments
Loading...