जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

Terrorists

अनंतनाग : जम्मू-काश्मीमरधील अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवाडा येथे आज पहाटे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली असून, आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. सीआरपीएफचे शीघ्र कृती दल, पोलीस व लष्कराच्या ३ राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याचाही समावेश होता. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके 47 रायफलसह स्फोटकं जप्त करण्यात आली होती.

एलओसीच्या पलिकडे लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती शनिवारी लष्कराकडून देण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांकडून कंठस्नान घालण्यात आल्यानंतर लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली होती.

भरमसाठ वीजबिल पाठविणाऱ्या महावितरणने ग्राहकांना केले आता ‘हे’ नवे आवाहन

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी विकास दुबेच्या दोन साथिदारांच्या मुसक्या आवळल्या

कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या