काश्मीरमध्ये मध्यम तीव्रतेचा भूकंप

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये मध्यरात्री २ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ५.० इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपात जीवित वा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुडगावसह अन्य ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.   जम्मू काश्मीरसह हरियाणामधील रोहतकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.