जम्मू काश्मीर-पंजाब सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांना अटक

टीम महाराष्ट्र देशा:-जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांना पोलिसांनी जम्मू काश्मीर-पंजाबजवळील लखनपूर येथून अटक करण्यात आली आहे.गुरुवारी सकाळी ही अटक करण्यात आली आहे. लखनपूर येथे पोलिसांनी ट्रक तपासणीसाठी थांबवलं असता ही कारवाई करण्यात आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रकमधून शस्त्रांची वाहतूक करत होते.

एका ट्रकमधून शस्त्रे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.लखनपूर येथे पोलिसांनी ट्रक तपासणीसाठी थांबवला असता ही कारवाई करण्यात आली. या दहशतवाद्यांकडून सहा एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.ट्रक पंजाबमधील बामियाल येथून काश्मीरच्या दिशेने चालला होता.अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी दिली आहे.पोलीस याप्रकरणी अजून तपास करत असल्याचंही मकेश सिंह यांनी सांगितलं आहे. अटक करण्यात आलेल्यांची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान,सुरक्षा दलाचे दोन दिवसातील हे मोठे यश आहे.काल जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.असिफ असे खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याच नाव असून तो लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा दहशत असल्याची माहिती मिळाली आहे.