जामिया विद्यापीठ आंदोलन, ‘या’ लेखकाने दिला मोदींना इशारा

modi-sad

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरातून त्याला विरोध केला जात आहे. ईशान्य भारतातील आसाम, गुवाहाटी सारख्या ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्यानंतर आता सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा लेखक चेतन भगत यांनी पण ट्विट करत मोदींना इशारा दिला आहे.

चेतन भगत ट्विटमध्ये म्हणतो, “जे हिंदू राजाबद्दल आणि त्याच्या अधीन असलेल्या प्रजेविषयी भारताबद्दल कल्पना करतात त्यांना हे आठवते. जरी मी आपल्या कट्टरपणाचा सन्मान केला (मी नाही), आपण 200 दशलक्ष मुस्लिमांची इच्छा करू शकत नाही. प्रयत्न करा आणि भारत जळून जाईल, जीडीपी क्रॅश होईल आणि तुमची मुलं असुरक्षित आणि बेरोजगार होतील. या कल्पना सोडून द्या!

“ माझ्या राजकारणाबद्दल अनेकजण येथे संभ्रमात पडतात. स्पष्टपणे सांगायचे तर फक्त अशा एका भारतामध्ये मला रस आहे जिथे प्रत्येकजण सुसंवाद साधतो आणि आपल्याकडे आर्थिक विकास आहे. ते माझे स्वप्न आहे. एकतर्फी गटबाजी मला कंटाळली. मी तुमच्या निश्चित बाजूवर नाही. मी भारताच्या बाजूने आहे. आणि याचा मला अभिमान आहे.

“नोटबंदी, जीएसटी, कलम ३७० आणि आता नागरिकत्व दुरूस्ती विधेयक या सर्वांची घोषणा झाल्यानंतर गोंधळ उडाल्याचे पहायला मिळालं. यावरुनच सरकारमध्ये सर्व गोष्टींना केवळ होकार देणारे अधिकारी भरलेले आहेत असं दिसून येत आहे. हे अधिकारी या गोष्टींकडे योग्य पद्धतीने पाहत नाहीत कींवा याबद्दल शंका उपस्थित करत नाहीत अथवा प्रश्नही विचारत नाहीत,” अशी चिंता चेतन भगतने व्यक्त केली आहे.

चेतन भगतने घेतलेल्या या भूमिकेचे नेटकऱ्यांनी स्वागत केल्याचे त्याच्या ट्विटला आलेल्या रिप्लायवरुन दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या