मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा ४० वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्याच्या घडीला सर्वांनाच माहीत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय सर्वाधिक बळी मिळविणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अलीकडेच बार्मी आर्मीने या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नेटवर सराव करताना दिसत आहे. सरावाच्या वेळीही अँडरसनला त्याच्या वयाची कसलीही अडचण येत नसल्याचे दिसत आहे. व्हिडिओ मध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट इनस्विंगने तिन्ही यष्टिचीत करून सर्वांनाच वेड लावले आहे.
अँडरसनचा हा व्हिडिओ शेअर करत बार्मी आर्मीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जिमी दुसर्या कसोटी मालिकेसाठी तयार होत आहे.’ याशिवाय, हा व्हिडिओ शेअर करताना बारमी आर्मीने त्याचे वर्णन ४० वर्षांचा युवा असे केले आहे. इंग्लिश संघाला २१ ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिका सुरू होण्याआधी अँडरसन नेट्स मध्ये कसून सराव करत आहे. आफ्रिकन संघाविरुद्धच्या मालिकेत इंग्लिश संघासाठी अँडरसनच्या कामगिरीला खूप महत्त्व आहे. तो सध्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांतील सर्वात प्रमुख खेळाडू आहे. अँडरसनने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला देखील बाद केले आहे.
त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने २००३ मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वे विरुद्ध कारकिर्दीची सुरुवात केली होती. अँडरसनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८५ सामने खेळताना ९४४ बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ६५७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६९ आणि टी-२० क्रिकेटमध्ये १८ बळी आहेत.
Jimmy getting ready for another Test series, 40 years young 😍
📹 IG: jimmya9 pic.twitter.com/JMut231NPq
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) August 4, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Venkatesh Prasad : भारताच्या ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानशी नेहमीच राहिला ३६चा आकडा; वाचा!
- Cabinet Expansion । शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, हे कारण आलं समोर
- China vs Taiwan | मोठी बातमी : चीनने तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागली, पण त्यातील 5 जपानमध्ये पडली
- Chhagan Bhujbal । “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”; राऊतांच्या अटकेवर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
- Eknath Shinde | ‘वर्षा’वर लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची ‘नेमप्लेट’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<