जांभूळबेट पर्यटनस्थळासाठी प्रयत्न करणार: सीईओ शिवानंद टाकसाळे

परभणी : जिल्ह्यात गोदावरीच्या कुशीत वसलेले जांभूळ बेट पर्यटन स्थळ व्हावे, म्हणून विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी मंगळवारी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पालम तालुक्यातील जांभूळबेट या निसर्गरम्य ठिकाणाला मंगळवारी (दि. 2) भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कृषिभूषण कांतराव  देशमुख, भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, गट विकास अधिकारी आर. व्ही. चकोर, सभापती विजयकुमार शिंदे, नांदेड येथील वृक्ष मित्र संघटनेचे पदाधिकारी, सरपंच अविनाश कदम, उपसरपंच राम कदम, जिल्हा कक्षातील ज्ञानेश्वर गायकवाड, प्रमोद टेंकाळे, महेंद्र डोंगरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

यावेळी जांभूळ बेटाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. मोठ्या प्रमाणात वृक्षांची उपलब्ध करून काटेरी बाबळी काढून त्या ठिकाणी फळांची वृक्षलागवड करणार असल्याचे या वेळी सांगितले. परभणीचा नागरिक म्हणून प्रत्येकाने जबाबदारी घेतल्यास लोकसभागातून जांभुलबेटाचा सर्वांगीण विकास होईल अशी भावना कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी ढोलकीपटू शाहीर सुभाष जोगदंड यांच्या संचाने उपस्थितांसमोर स्वच्छता व स्वागत गीतांचे सादरीकरण केले.

महत्त्वाच्या बातम्या