रावसाहेबांना धक्का,जालना जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात

ravsaheb danave

जालना : महाराष्ट्रात आज जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये एकूण 56 सदस्य असून त्यावर सत्ता काबीज करण्यासाठी 29 सदस्यांशी आवश्यकता होती. त्यानुसार शिवसेनेकडे 14, राष्ट्रवादी कडे 13 आणि कॉंग्रेस कडे 5 सदस्य होते. त्यामुळे शिवसेनेच्या उत्तम वानखेडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जालना जिल्हापरिषदेत सध्या भाजपा – २२, शिवसेना – १४, राष्ट्रवादी -१३, काँग्रेस -५ व अपक्ष – २ असे संख्याबळ आहे. या अगोदर जिल्हापरिषद अध्यक्ष शिवसेनेचाच होता. तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा होता. आता पुन्हा या अशीच परिस्थिती असणार आहे. उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीच्या उमेवदवाराची वर्णी लागणार आहे.

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्य मंत्री यांची गुप्त बैठक झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याचा भाजप देखील प्रयत्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होते.