fbpx

पीकविमा योजनेच्या पैश्यासाठी बँक कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला दिला अजब सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी मनोज महाजन यांना जून २०१७ च्या पीकविमा योजनेतून ६९ हजार रुपये मंजूर झाले होते. मात्र मंजूर कर्जापेक्षा पाच हजार रुपये त्यांना जिल्हा बँकेच्या एरंडोल शाखेतून कमी मिळाले, म्हणून त्यांनी विचारणा केली असताना त्यांना कर्मचाऱ्याने अजब सल्ला देत म्हणाला की तुला पैसे हवे असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जावे लागेल, अश्या पद्धतीने त्याची खिल्ली जिल्हा बँकेच्या एका कर्मचाऱ्याने उडवली. त्यामुळे हताश शेतकऱ्याने बँकेच्या शाखेतच काल आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु तेथे उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावली आणि त्यांचे प्राण वाचले.

नेमकं की आहे प्रकरण :

शेतकरी मनोज महाजन यांनी १२ जून २०१७ रोजी किसान डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे मिळाले नाही. याबद्दल माहिती घेत असताना त्यांना समजले की पैसे याआधीच काढले असल्याची नोंद त्यांच्या खात्यावर झाली आहे. याबाबत एरंडोल शाखेत दीड वर्षापासून खेट्या घालूनही महाजन यांना उत्तर मिळाले नाही. यासर्व प्रकारातून हताश झालेले महाजन जळगावच्या शाखेत माहिती घेण्यासाठी आले असता हा प्रकार घडला.

जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन