आज खडसेंची परीक्षा ; मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मतदार संघातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून जळगावातील या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई नगर पंचायत निवडणुकीसाठी आज पहिलं मतदान होत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण तीन, तर नगरसेवक पदासाठी एकूण 73 उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुकीत भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी अनोखी आघाडी आहे, तर काँग्रेस स्वबळावर लढत आहे. एकूण 23 हजार 726 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.