जळगावची जिलेबी जपानमध्ये गेली

जळगाव : ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सहज पोहचलेल्या जिलेबीने जपानच्या खवय्यांनाही आपलेसे करुन टाकले. नुकतीच एक जपानी टिमने मनसोक्त आस्वाद घेत जिलेबीची रेसीपी जळगावातून नेली.

जळगावातील मुळचे रहिवासी डॉ. अभिषेक जैस्वाल हे अनेक वर्षामध्ये जपानची राजधानी टोकियो येथे स्थायिक झाले आहे. नुकतेच ते जळगाव येथील त्यांचे नातेवाईक नितीन लालापुरे यांच्यकडे येऊन गेले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आरती जैस्वाल तसेच जपानमधील नुरोसान, नोबुको, सुमीको, युमीकोसान, त्सुमो आदी जपानी महिला व काही पुरुषांची टीमही भारत काही दर्शनासाठी आली होती.

यादरम्यान लालापूरे यांनी या सर्वाना जळगावातील ब्रिजविलास स्वीट मार्ट येथे जिलेबीचा, रबडी, पापडी आदी पदार्थाचा आस्वाद देण्यासाठी आणले. हे सर्व पदार्थ खूपच आवडीने त्यांनी संचालक सतीश अग्रवाल यांच्याकडून साधी जिलेबी, मावा, जिलेबी आणि रबडी व पापडीचीही रेसीपी समजून घेत लिहूनही घेतली

1 Comment

Click here to post a comment