महाजनांच्या समोर फ्रीस्टाईलं हाणामारी, नेमकं काय आहे पडद्यामागील राजकारण ?

जळगाव: भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईलं हाणामारी पहायला मिळाली आहे. आता हि हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्यापक्षातील नेत्यांमध्ये नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांत झालीय, त्यामुळे राज्यभरात भाजपसाठी संकटमोचक असणाऱ्या महाजन यांच्यावर आपल्या घरातील बंडखोरीचे संकट आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना-भाजप संयुक्त मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार ड़ॉ. बी.एस. पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे. जळगाव लोकसभेचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे भाजप – सेना कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाघ आणि पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे सर्व प्रकार हाताबाहेर जात एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.

Loading...

 नेमका काय आहे उदय वाघ – बी.एस. पाटील यांच्यातील वाद

जळगाव लोकसभेसाठी सुरुवातीला भाजपाने  जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आ स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी वाघ यांचा पत्ता कट करत आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यामुळे स्मिता वाघ यांचे तिकीट कापले गेल्याची चर्चा आहे. वाघ दाम्पत्य हे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान आज होत असताना काल घडलेला प्रकार भाजपसाठी लाजीरवाणा आहे, याबद्दल बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मेळाव्यात झालेला प्रकार हा गंभीर असून ज्याने हा प्रकार घडवून आणला त्यांना सोडणार नाही. माजी आमदार पाटील यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सोडवित होतो. मात्र मला कुठल्याही प्रकराची धक्काबुक्की किंवा मारहाण झालेली नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'