भाजपा आमदारचं कुत्र चोरीला; पोलिसात तक्रार दाखल

जळगाव : घरातील किमती ऐवज दाग- दागिने पैसे अशा सारख्या किमती वस्तू चोरीला जाण्याच्या घटना बऱ्याचवेळेला घडत असतात, मात्र आता चोरटयांनी त्याच्याही पुढे जाऊन, चक्क कुत्र्याची चोरी केलीये. भाजप आमदार चंदूलाल पटेल यांच्या कुत्र्याची चोरी झालीये. हा कुत्रा लॅबरेडॉर जातीचा होता.

जळगावात सध्या दिवसाढवळ्या चोरी, लूटमार आणि घरफोडीच्या घटना वाढल्यात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता व्हिआयपीसुद्धा चोरट्यांचे लक्ष्य बनलेत. शहरातील जयनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या भाजप आमदार चंदूलाल पटेल यांच्या दारातून लॅबरेडॉर जातीच्या कुत्र्याची चोरी करण्यात आलीय. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पटेल यांच्या दारातून हा कुत्रा पळवलाय. चोरट्यांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. या संदर्भात आमदार चंदूलाल पटेल यांनी रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.

मोबाईल चोरीच्या घटना टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय .

You might also like
Comments
Loading...