अंजली दमानियांच्या विरोधात अटक वॉरंट

मुंबई / जळगांव: माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विरोधात जळगांव जिल्ह्यातील रावेर न्यायालयाचे न्या.डी.जी. मालविय यांनी आज अटक वॉरंट जारी केला. त्यामुळे अंजली दमानिया जेथे असतील तेथे त्यांना अटक होवू शकते.

जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर आरोप अंजली दमानिया यांनी जळगावात येवून केल्याबद्दल भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला (क्रमांक ४१६) कलम (५०० व ५०१) नुसार दाखल केला होता. या खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होवूनही अंजली दमानिया न्यायालयात हजर होत नव्हत्या. म्हणून आज अखेर त्यांच्या विरोधात न्यायाधीशांनी अटक वॉरंट काढले. या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड.चंद्रजित पाटील व ॲड. तुषार माळी काम पाहत आहेत.

You might also like
Comments
Loading...