जलयुक्त अभियान ही सर्वोच्च प्राथमिकता : नुतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी

अहमदनगर/स्वप्नील भालेराव : अहमदनगर जिल्हा मोठा असल्याने प्रत्येक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न समजावून घेवून थेट गावपातळीवर संपर्क करून विकास योजना जलद गतीने लावण्यावर भर राहिल व जलयुक्त शिवार अभियान प्रभावी पणे राबविण्यासाठी प्राधान्य राहिल असा मनोद्य नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी व्यक्त केला .

प्रभारी जिल्हाधिकारी भानूदास पालवे यांच्याकडून द्विवेदी यांनी पदभार स्वीकारल्याने लागलीच महसूल विभागातील कार्यरत अधिकारी पदाधिकारी यांची बैठक बोलावून यात विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. यात जलयुक्त शिवार अभियानाचा मुद्दा अग्रभागी घेवून जिल्ह्य़ातील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकरत कसा सोडवता येईल यावर चर्चा झाली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी पालवे , उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर , वामनराव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत , उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर , जिल्हा नियोजन अधिकारी एन.एस.भदाने , तहसीलदार अप्पासाहेब शिंदे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.