fbpx

मोदींचे पंतप्रधानपदासाठी पहिल्यांदा नाव सुचवणारेही जेटलीच होते

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, त्यासाठी त्यांचे नाव पहिल्यांदा सुचवणारेही जेटलीच होते. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावरही जेटलींनी त्यांच्या प्रत्येक धोरणाची पाठराखण केली, विशेषतः आर्थिक धोरणांच्या कार्यवाहीसाठी जिवाचे रान केले. मात्र, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा मात्र जेटली प्रकृतीच्या कुरबुरीने पुर्वीच्या तडफेने निवडणूक प्रक्रियेत सामील होवू शकले नाहीत.

पीएम मोदी यांनी ट्विटरवरून जेटली यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, की अरुण जेटली यांच्या निधनाने मी सच्चा मित्र गमावला आहे. त्यांना मी अनेक दशकांपासून ओळखत होतो याचा मला अभिमान होता. त्यांची आकलन क्षमता जेवढी होती त्या तोडीचा खूपच कमी लोक आहेत. ते आनंदात जगले. ते अनेक आनंदाचे क्षण पाठिमागे ठेवून गेले आहेत. आम्हाला त्यांची सदैव आठवण येत राहिल.

अरुण जेटली यांचं एक अतूट नात होत. एक प्रखर विद्यार्धी नेता म्हणून त्यांनी आणिबाणीच्या काळात लोकशाही रक्षणात अजोड योगदान दिले होते. आमच्या पक्षातील ते लोकप्रिय नेते होते. असे ट्विट करून जेटलींना श्रद्धांजली वाहून आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान जेटली यांना ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

महत्वाच्या बातम्या