‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे’; राष्ट्रवादीत परतल्यानंतर गायकवाडांची गर्जना

jaysingrao gaikwad

मुंबई : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.

त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. आता, भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.

यानंतर, ‘आता मी आलोय साहेब, येणाऱ्यांची मालिका फार मोठी आहे. ते आता सगळेच बाहेर येणार आहेत’ अशी गर्जना करत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला इशारा दिला आहे. ‘मान-सन्मान नाही, कामाची कदर नाही, केलेल्या कामाचं कौतुक नाही, चांगल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, अशा पक्षात कोण राहील? गेली 12 वर्ष भाजपसोबत होतो. राष्ट्रवादी सोडल्याचा मला पश्चात्ताप होतोय. पण आता प्रायश्चित्त करतो आहे. भाजप नेते नितीन गडकरी आमचे मित्र आहेत. पण आज त्यांचीही काय अवस्था आहे हे तुम्हालाही माहिती आहे.’ अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या