fbpx

सुशीलकुमार नव्हे तर आंबेडकरांबरोबर सामना जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी अर्ज भरला

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार नव्हे तर माझा सामना थेट वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याशी होणार असल्याचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अगदी साधेपणाने येऊन निवडणूक निर्णयाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला.

यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या बरोबर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख , सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे , सेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि भाजपचे शहराध्यक्ष शहाजी पवार आदी मंडळी होती.

माध्यमांशी बोलताना महास्वामी म्हणाले, आपण राष्ट्रप्रेमासाठी निवडणूक लढवत आहे. सोलापूरचा विकास करणे हेच आपले एकमेव लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि पुन्हा ते देशाचे पंतप्रधान होण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.